Nana Patole : काँग्रेसचे काही आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर नाराज

स्वबळाची वारंवार भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आता काँग्रेसच्या नेत्यांच्या तक्रारी वाढल्या असून, नानांचे प्रदेशाध्यक्षपद आता धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. नानांच्या सततच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसचे काही मंत्री नाराज झाले असून, हे मंत्री आता नाना पटोले यांची हायकमांडकडे तक्रार करणार आहेत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते वारंवार महाविकास आघाडीला अडचणीत आणत असून, नाना पटोलेंची रोज रोजची वक्तव्य कॅाग्रेसला अडचण निर्माण करणारी असल्याची भावना काँग्रेसच्या मंत्री तसेच काही आमदारांची आहे. भाजपला बाजूला सारण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली असून, आता नानांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी वितूष्ट निर्माण होत असल्याची भावना काही कॉंग्रेसच्या मंत्र्यांची आहे. लवकरच काँग्रेसमधला एक गट काॅग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून नाराजी व्यक्त करणार आहे. तसेच काही स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील नाना पटोले यांच्यावर नाराज आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola