Maharashtra Congress Meeting : काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत तातडीची बैठक, विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार?
Continues below advertisement
आज मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक विधान भवनात होणाराय. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेत्यांसह प्रभारी एच.के. पाटील उपस्थित राहणार आहेत. ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता, अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी कसा समन्वय साधणार, याची सर्वानाच उत्सुकता आहे.
Continues below advertisement