Maharashtra State Assembly : मंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेण्यास काँग्रेसच्या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांचा नकार

हिवाळी अधिवेशनानंतर म्हणजेच जानेवारी महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची देखील शक्यता आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष पदाचा तिढा आता दिल्ली दरबारी गेल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांची नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या यादीत चर्चेत होतं. ही तीन नावं कोण हे अद्याप समोर आलेलं नाही मात्र हे तिन्ही नेते स्वतःकडे सध्या असलेलं मंत्रिपद सोडून विधानसभा अध्यक्षपद घेण्यास तयार नसल्याचंही कळतं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola