Maharashtra Congress : Sunil Kedar गटाच्या मुलाखती अवैध, Harshvardhan Sapkal यांचा निर्णय
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीत, काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या गटाने घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवल्या आहेत. जिल्हा निवड समितीच्या अनुपस्थितीचे कारण देत या मुलाखती रद्द करण्यात आल्या असून, आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार नव्याने मुलाखती घेतल्या जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'जिल्हा निवड समितीच्या अनुपस्थितीमुळे सुनील केदार गटाने घेतलेल्या मुलाखती अवैध आहेत,' असे जाहीर केले. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या सुनील केदार यांना डावलण्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement