Maharashtra Congress chief | बदल केल्यास बिगर मराठा चेहरा द्यावा, पृश्वीराज चव्हाणांचं मत : सूत्र
बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर आता पक्षाचे प्रभारी एच के पाटील दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी मंगळवारी (5 जानेवारी) रात्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोघांशी सह्याद्री गेस्टहाऊसवर स्वतंत्रपणे चर्चा केली. अशोक चव्हाण यांच्यासोबत होणारी चर्चा काल चर्चा होऊ शकली नाही. ती आज सकाळी नऊ वाजता होणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळपास तासभर महाराष्ट्र प्रभारींसोबत खलबते केली. सध्याची व्यवस्था कायम ठेवा, लगेच बदलांची गरज नाही असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. तसंच काही सूचना देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या.
Tags :
Smart Bulletin Prithviraj Chavan Ashok Chavan National News State News Balasaheb Thorat Abp Majha Coronavirus Update