मुख्यमंत्री ठाकरे घेणार अमित शाहांची भेट, नक्षलवादी कारवायांसंदर्भात रविवारी चर्चा
Maharashtra Cm Uddhav thackeray meeting-with-amit-shah : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. नक्षलवादी कारवायांसंदर्भात बैठक घेऊन चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ही बैठक रविवारी होणार आहे. नक्षल प्रभावित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर दोघांची वेगळी बैठक होणार का याकडे लक्ष लागून आहे.