Human-Leopard Conflict: पुण्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव, सरकार नसबंदीचा निर्णय घेण्याच्या तयारीत

Continues below advertisement
पुण्यातील (Pune) बिबट्यांच्या हल्ल्यात (Leopard Attack) झालेल्या जीवितहानीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. '... मोठ्या प्रमाणात स्टरलायजेशनचा प्रोग्राम (Sterilisation Program) हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, अशा प्रकारची परवानगी आम्हाला घ्यावी द्यावी,' असे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्पष्ट केले. यासोबतच, काही बिबट्यांना पकडून रेस्क्यू सेंटर्समध्ये (Rescue Centers) ठेवण्यासाठीदेखील केंद्राच्या परवानगीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात, विशेषतः पुणे जिल्ह्यात, मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर बनला आहे. अलीकडच्या काळात झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा कार्यक्रम राबवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे परवानगी मागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भात केंद्रासोबत प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच रीतसर प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola