Maha Civic Polls: 'खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे', राज्य निवडणूक आयोगाची घोषणा
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. 'उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे,' असे आयोगाने स्पष्ट केले. या निर्णयानुसार, 'अ' वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदाकरिता १५ लाख आणि सदस्यपदाकरिता ५ लाख रुपये खर्च मर्यादा असेल. 'ब' वर्गासाठी अध्यक्षपदाकरिता ११ लाख २५ हजार आणि सदस्यपदाकरिता ३ लाख ५० हजार, तर 'क' वर्गासाठी अध्यक्षपदाकरिता ७ लाख ५० हजार आणि सदस्यपदाकरिता २ लाख ५० हजार रुपये खर्च करता येतील. नगरपंचायतींसाठी अध्यक्षपदाकरिता ६ लाख आणि सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार अशी नवी खर्च मर्यादा आहे. या निवडणुका पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) द्वारे होणार असून, यासाठी १३,७२६ कंट्रोल युनिट आणि २७,४५२ बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर विशेष सर्च फॅसिलिटी (Search Facility) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement