Pawar Politics: अजित पवारांचे चिरंजीव Jay Pawar राजकारणात? बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची शक्यता
Continues below advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) यांच्या राजकीय वर्तुळातील प्रवेशाची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जय पवार हे बारामती नगरपरिषदेमधून (Baramati Municipal Council) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असू शकतात,’ असे सांगितले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर ही बातमी समोर आली आहे. जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे बारामतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी जय पवार यांनी आपले वडील अजित पवार आणि आई सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement