Maharashtra Politics: 'नाचता येईना अंगण वाकडं', Gopichand Padalkar यांचा MVA आघाडीवर हल्लाबोल
Continues below advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) रखडलेल्या निवडणुकांवरून भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार टीका केली आहे. 'नाचता येईना अंगण वाकडं, अशी परिस्थिती त्या विरोधकांची झालेली आहे,' अशा शब्दात पडळकर यांनी MVA च्या भूमिकेवर ताशेरे ओढले. दोन महिन्यांपूर्वी निवडणुका घ्या म्हणून हेच लोक मागणी करत होते आणि आता निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्यावर मतदार यादीत दुबार नोंदणीसारखी (Duplicate Voters) कारणे सांगून निवडणुकीला सामोरे जायला घाबरत आहेत, असा आरोपही पडळकरांनी केला. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, याची आठवण करून देत, निवडणूक घेणे किंवा न घेणे हा सर्वस्वी निवडणूक आयोगाचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement