Caste Census | 1931 नंतर पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना, समिती स्थापन,कामाला वेग
Continues below advertisement
राज्य शासनाने जातनिहाय जनगणनेसाठी तयारी सुरू केली आहे. 1931 नंतर पहिल्यांदाच ही जनगणना होणार आहे. या कामाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक आदेश काढला आहे. या आदेशानुसार, राज्यातील जनगणना सुरळीत पार पडावी यासाठी संनियंत्रण आणि अंमलबजावणीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौदा जणांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे राज्य ओबीसी कर्मचारी आणि अधिकारी महासंघाने स्वागत केले आहे. 2027 साली होणाऱ्या जनगणनेची तयारी राज्य सरकारने आतापासूनच सुरू केल्यामुळे जनगणनेच्या कामाला वेग येणार आहे. या जनगणनेमुळे राज्यातील विविध समाजघटकांची अचूक माहिती उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
Continues below advertisement