PM Modi Manipur Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर 7,300 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा हा मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. ते सुराचंदपुरला पोहोचतील जिथे ते विस्थापित जणांची भेट घेणार आहेत. मे 2023 पासूनच्या हिंसाचारात 260 जणांचा मृत्यू झाला असून, मैतेई-कुकी संघर्षामुळे 60,000 लोक विस्थापित झाले आहेत. मैतेईंना ST दर्जा देण्याविरुद्ध कुकींचे हिंसक आंदोलन सध्या सुरू आहे. मैतेईच्या सहा संघटनांनी आज मणिपूर बंदची हाक दिली आहे. खराब हवामानाचा मोदींच्या दौऱ्याला फटका बसू शकतो. पोलीस, CRPF, BSF, आसाम रायफल्सचे 10,000 जवान या दौऱ्यादरम्यान तैनात असतील. 13 फेब्रुवारी 2025 पासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे. मोदी मणिपूरसह आसाम आणि मिझोरमच्या दौऱ्यावर असून, तीन राज्यांमध्ये 36,000 कोटींचे विकास काम सुरू करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola