Maharashtra Cabinet Control | CM Fadnavis यांचा Urban Development, Finance खात्यांवर अंकुश, Mahayuti मध्ये खदखद

महायुती सरकारमध्ये अंतर्गत वाद आणि कुलघडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर यापूर्वीच अंकुश ठेवला होता. आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावरही अंकुश लावल्याची चर्चा आहे. यानुसार, नगरविकास खात्याकडून मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी निधी वाटपाला लगाम घातल्याचे दिसत आहे. नगरविकास खात्याकडून फक्त शिंदे गटाच्या आमदार आणि नगरसेवकांना निधी पुरवला जात असल्याची कुदकुद महायुतीच्या मित्र पक्षांच्या आमदारांमध्ये होती. मित्र पक्षाच्या आमदारांना तितका निधी मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता नगरविकास खात्याच्या कारभारात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे महायुतीमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola