Al-Qaeda Arrests | गुजरात ATS ची मोठी कारवाई, Delhi-Noida सह 4 संशयित Al-Qaeda दहशतवादी अटकेत
गुजरात एटीएसने अल कायदाशी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या कारवाईत गुजरातमध्ये दोन, दिल्लीत एक आणि नोएडा येथे एका संशयिताला अटक करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने ही मोठी कारवाई केली. अटक करण्यात आलेले आरोपी अल कायदाची विचारसरणी पसरवत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, हे संशयित सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना आपल्या गटात सामील करून घेत होते, अशीही माहिती समोर आली आहे. अल कायदाची विचारसरणी पसरवण्याच्या आरोपाखालीच गुजरात एटीएसने या संशयितांना ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे दहशतवादी कारवायांना आळा घालण्यात यश आले आहे. पुढील तपास सुरू आहे.