Merry Christmas 2019 | मुंबईसह देशभरात नाताळचं सेलिब्रेशन, माऊंट मेरीसह सर्व चर्चना आकर्षक रोषणाई | ABP Majha
नाताळनिमित्त (ख्रिसमस) मुंबई, नाशिक, वसई, गोव्य़ासह देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. विविध शहरातल्या बाजारपेठा नाताळनिमित्त फुलून गेल्या आहेत. ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी आकाश कंदिल यासह विविध वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. सर्व चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावे साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. नाशकातील कॅनडा कॉर्नर परिसरातील सेंट आंद्रिया चर्चला रोषणाई करण्यात आली असून चर्चबाहेर येशूंचा जिथे जन्म झाला त्या गाईच्या गोठ्याची प्रतिकृती साकारण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.