Maharashtra Cabinate Meeting : आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक; महाविद्यालयं सुरु होणार? निर्णयाकडे लक्ष
Continues below advertisement
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. दुपारी 12.30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं होणार आहेत. यावेळी राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्याविषयी चर्चा होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्गाचं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाकडे लक्ष असेल. दरम्यान अजित पवारांनी पुण्यातील कॉलेज सुरु करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच राज्यभरातले कॉलेज सुरु होतील असं सामंत यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं कॉलेज सुरु करण्यावरुन महाविकास आघाडीमध्येच स्पर्धा सुरु असल्याचं अधोरेखित झालंय. दरम्यान पदोन्नतीतील भटक्या विमुक्त जातींचं आरक्षण आणि ओबीसींचा मुद्दाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत गाजण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement