Maharashtra Bus Scam : वाहन खरेदी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांचे सरकारवर ताशेरे
कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापन विभागानं १२ ते १७ लाखांची मिनी-बस देखभाली कंत्राटासह ३ कोटी रुपयांना खरेदी केल्याचं एबीपी माझानं उघडकीस आणलं होतं.. आर्यन पम्प्स अँड एन्व्हिरो सोल्युशन्स असं या कंपनीचं नाव आहे. याप्रकरणी एसआयटी नेमण्याचं आश्वासन देखील सध्याच्या मंत्र्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र 5 महिने उलटून देखील सरकारने कुठलीच कारवाई न केल्याने आता लोकायुक्तांनी सरकारलं चांगलंच धारेवर धरलं आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीये.. वाढीव दरानं गाड्या खरेदी करणारा आपत्ती व्यवस्थापन हा एकमेव विभाग नाहीय. ठाणे आणि पुणे मनपानं देखील अशाच वाढीव दरानं त्याच कंपनीकडून गाड्या खरेदी केल्याचं समोर आलंय. म्हणजेच, १२ ते १७ लाखांच्या टेम्पो-ट्रॅव्हलरसाठी ठाणे महानगरपालिकेनं तब्बल १ कोटी ९३ लाख रुपये मोजले.. तर पुणे मनपानं १ कोटी ८३ लाख दिले. म्हणजे तब्बल १२ ते १३ पट अधिक पैसे देऊन या गाड्या खरेदी करण्यात आल्या. समृद्धी महामार्गासाठी सुद्धा याच कंपनीकडून तब्बल ११४ कोटींच्या गाड्या घेण्यात आल्या. याप्रकरणी 26 एप्रिलला सरकारने उत्तर सादर करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.