MP Bus Accident : इंदूरवरुन पुण्याला जाणाऱ्या बसचा अपघात, बस पुलावरुन कोसळून 13 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
18 Jul 2022 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMadhya Pradesh Bus Accident: मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून जळगावमधील अमळनेरकडे येणारी एसटी बस नर्मदा नदीत (Maharashtra ST Bus Accident in Madhya Pradesh) कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.
एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही जळगावमधील अमळनेर येथे येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसटीचे अधिकारीदेखील घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती चन्ने यांनी दिली.