Maharashtra Bull Race: बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासंदर्भात राज्य सरकारची याचिका ABP Majha

Continues below advertisement

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटिसा बजावण्यात आली असून त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आलाय. २०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली. त्यानंतर ही बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणे असे अनेक प्रकारे अत्याचार केले जातात असं सांगत प्राणीमित्रांनी शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आणि अजूनही प्राणीमित्र आपल्या मागणीवर ठाम आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram