Maharashtra : विधिमंडळ अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस, आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार
Continues below advertisement
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होणार आहे. काल हा प्रस्ताव सादर होऊ न शकल्याने आज सादर केला जाणार आहे. या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली जाणार आहे.. तसंच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केली नाही. यावरुन देखील विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसंच वाढती महागाईसह विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत... तसंच आज विधान परिषदेमध्येही अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
Continues below advertisement