Maharashtra HSC Results 2020 | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

Continues below advertisement
खेर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2020 Declared) झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता.

या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोककण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण 14, 20, 575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14, 13, 687 विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram