Maharashtra BJP : भाजपच्या 12 निलंबित आमदार प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ABP Majha

Continues below advertisement

 यानंतरची बातमी भाजपच्या १२ निलंबित आमदार प्रकरणाची... भाजपच्या निलंबित आमदारांना दिलासा मिळणार की प्रश्न कायम राहणार यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ११ जानेवारीला याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दिवसभर झालेल्या युक्तिवादात कोर्टानं या कारवाईवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. निलंबनाची कारवाई बरखास्तीपेक्षाही जास्त कडक ठरत असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं आणि त्यानंतर आज ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांना आज कोर्टाकडून दिलासा मिळतो का हे पाहावं लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram