Inflation : कांदा, टोमॅटोचे भाव गगनाला, तरीही सरकार म्हणतंय स्वस्ताई
Continues below advertisement
गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत सध्या महागाई कमी झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. तशी आकडेवारी देखील सरकारनं जाहीर केलीय. मात्र या आकडेवारीवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. एक किलो टोमॅटोसाठी 60 रुपये तर एक किलो कांद्यासाठी 50 रुपये मोजावे लागताहेत. एरवी 15 ते 20 रुपये किलो दरानं मिळणारा कोबी 60 रुपयांचा भाव खातोय. इतर भाज्यांचे भाव देखील कडाडलेत.
Continues below advertisement