Beed Flood : 'ओला दुष्काळ जाहीर करायला आणखी कोणते निकष हवेत?' बीडच्या शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
Continues below advertisement
Maharashtra Marathwada Rain Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update) राज्यातील काही भागात तुफान पाऊस झाला. या पावसानं होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. बीडमधील एकूण 63 महसूल मंडळापैकी 61 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सरकारला ओला दुष्काळ जाहीर करायला आणखी कोणते निकष हवेत? असा सवाल बीडच्या शेतकऱ्यांना पडला आहे.
Continues below advertisement