Starlink in Maharashtra: 'स्टारलिंक'सोबत ऐतिहासिक करार, गडचिरोली, नंदुरबारसारख्या दुर्गम भागात आता सॅटेलाईट इंटरनेट!

Continues below advertisement
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) इलॉन मस्कच्या (Elon Musk) 'स्टारलिंक' (Starlink) कंपनीसोबत एक मोठा आणि ऐतिहासिक करार केला आहे, ज्यामुळे राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सेवा पोहोचणार आहे. 'या करारामुळे स्टारलिंकसोबत औपचारिक भागीदारी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. या करारानुसार, गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम यांसारख्या जिल्ह्यांमधील सरकारी संस्था, ग्रामपंचायती, शाळा आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधांना हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध करून दिले जाईल. माहिती आणि तंत्रज्ञान (Information and Technology) विभागाचा हा या वर्षातील सर्वात मोठा करार मानला जात असून, यामुळे राज्याच्या 'डिजिटल महाराष्ट्र' (Digital Maharashtra) या महत्त्वाकांक्षी मोहिमेला मोठी गती मिळणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola