Mumbra मुंब्र्यात ATS चे छापे, शिक्षक ताब्यात, मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त केल्याचा संशय
Continues below advertisement
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) मुंब्रा येथील कौसा भागात छापेमारी करून इब्राहिम अबिदी (Ibrahim Abidi) नावाच्या शिक्षकाची चौकशी सुरू केली आहे. ही कारवाई पुण्यातील अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणात अटक केलेल्या जुबेर इलियास हंगरगेकर (Zubair Ilyas Hungargekar) याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. एटीएसला संशय आहे की अबिदी मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता. 'माझे पती साबूसिद्दीक कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, ते आता निवृत्त झाले आहेत आणि कोणताही मदरसा किंवा इतर ठिकाणी शिकवत नाहीत,' असे त्यांची पत्नी महजबीन अबिदी यांनी म्हटले आहे. एटीएसने अबिदीच्या घरातून हार्ड डिस्क आणि फोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement