Maharashtra Local Body Polls: BJP मध्ये बैठकींचं सत्र, उमेदवारांना AB फॉर्म रवाना; 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत.
Continues below advertisement
महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार निश्चित केले असून, त्यांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काल रात्री उशिरा भाजपच्या प्रदेश कार्यालयातून हे एबी फॉर्म रवाना झाले. एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नगराध्यक्षपदासंदर्भातली उमेदवार निश्चिती झाली आहे आणि बहुतांश उमेदवारांना काल भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे'. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ आहे, तर उर्वरित उमेदवारांची घोषणा पुढील दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement