ATS Raids : Mumbra मध्ये ATS चे छापे, शिक्षक Ibrahim Abidi सह दोघांची कसून चौकशी.
Continues below advertisement
पुण्यातील अल कायदा (Al-Qaeda) कनेक्शनच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) मुंब्रा (Mumbra) येथे मोठी कारवाई केली आहे. एटीएसने मुंब्र्यातील चार घरांवर छापे टाकून शिक्षक इब्राहीम अबिदी (Ibrahim Abidi) याच्यासह दोघांची चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी, 'अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट' (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ प्रचार केल्याच्या आरोपावरून पुणे येथून सॉफ्टवेअर इंजिनियर जुबेर इलियास हंगरगेकर (Zuber Ilyas Hangargekar) याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एटीएसला संशय आहे की, 'हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता'. पथकाने अबिदीच्या घरातून आणि कुर्ल्यातील त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या असून, त्यांचा पुढील तपास सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement