Red Fort Blast: लाल किल्ला स्फोट तपासासाठी NIA ची विशेष टीम तैनात, Vijay Sakhare करणार नेतृत्व

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे, ज्यामध्ये दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचे नेतृत्व एनआयएचे अतिरिक्त महासंचालक (ADG) विजय साखरे करणार आहेत. 'एनआयए महासंचालक आणि आयबी प्रमुखांची आज यावर चर्चा झाली आणि हे तपास पथक आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.' हा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर घेण्यात आला, ज्यामध्ये एनआयएचे महासंचालक सदानंद वसंत दाते आणि आयबी प्रमुख उपस्थित होते. या स्फोटात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola