Maharashtra : राज्यातील CBSE, ICSE शाळांसाठी मराठी विषयांचे मूल्यांकन अ, ब, क, ड श्रेणी स्वरुपात
मुंबई: महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये म्हणजे सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रीज शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून पुढील तीन वर्षापर्यंत इयत्ता आठवी, नववी आणि दहावी विद्यार्थ्यांचे मराठी विषयांचे मूल्यांकनाकरिता अ,ब,क, ड श्रेणी स्वरूपात केले जाणार आहे. या मूल्यांकनाचा समावेश परीक्षा मंडळाच्या इतर विषयांच्या गुणांच्या मूल्यांकनामध्ये करण्यात येणार नाही