Maharashtra Assembly Special Session : Maratha Reservation साठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकालात निघण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या राज्य सरकारकडून २० फेब्रुवारीला एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) कायदा मंजूर करण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. कुणबी (Kunbi Record) नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी आरक्षण लागू व्हावे, अशी प्रमुख मागणी जरांगे-पाटील यांनी केली होती. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी यासंदर्भात अधिसूचना काढली होती. त्यामध्ये सगेसोऱ्यांची व्याख्या मान्य करत मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्याचा उल्लेख होता. हाच मसुदा असलेला कायदा आता विधिमंडळात मंजूर होऊ शकतो, अशी माहिती आहे.