काय आहे विधानसभा अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ; विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे ‘माझा’वर

मुंबई : विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून विचारला आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राज्यपालांना तारीख ठरवणं बंधनकारक असतं, अशी माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना निवड प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली.

डॉ. अनंत कळते म्हणाले की, "विधानसभा अध्यक्ष निवडीची तारीख ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपाल ही तारीख ठरवतात. मंत्रिमंडळाने शिफारस केल्यानंतर राज्यपालांना तारीख ठरवणं बंधनकारक असतं. राज्यपाल निवडणुकीची तारीख देतील त्याच्या आदल्या दिवशी अनुमोदक आणि अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला पाहिजे. शक्यतो सात दिवस आधी सदस्यांना कळवणं महत्त्वाचं असतं, मात्र त्यात बदलही करता येतो."

राज्यपालांनी सहा ही तारीख दिली तर पाच तारखेला फॉर्म भरुन प्रक्रिया पार पाडता येईल. विधानसभा अध्यक्षांची निवड नियम 6/3 प्रमाणे गुप्त प्रमाणे घेता येते. सर्व आमदारांना दोन तासांची वेळ मतदानासाठी दिली जाते. दोन पेक्षा जास्त उमेदवार आले तर ज्याला कमी मत आहेत त्यांना वगळून पुन्हा दोघांमध्ये निवडणूक होईल." 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola