'अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले तर रॉबरीचा गुन्हा दाखल करा', संजय गायकवाडांचा वादग्रस्त व्हिडीओ
बुलढाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ते "कुणी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रॉबरीचे गुन्हे दाखल करा. तुम्हाला कुणी त्रास दिला तर मी तुम्हाला अस्त्र-शस्त्राचगळी ताकद पुरवतो," असं वक्तव्य करताना दिसत आहेत.