Maharashtra Assembly Monsoon Session : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

Continues below advertisement

Maharashtra Assembly Monsoon Session : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

एकीकडे राज्य सरकारकडून महाराष्ट्रात वेगाने विकास होत असल्याचे दावे केले जात असले तरी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 2024 मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे.

 जानेवारी ते एप्रिल2024 या चार महिन्यांत राज्यात 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेय. सर्वाधिक 235 आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत 208, मार्चमध्ये 215 आणि एप्रिलमध्ये 180 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. याचा हिशेब लावायचा झाल्यास या चार महिन्यांत दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याचे दिसत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या गंभीर गोष्टीकडे राजकारण्यांसह सामान्य जनतेचेही दुर्लक्ष झाले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram