Asha workers on strike : राज्यातील 70 हजार आशा वर्कर्स आजपासून संपावर
राज्यातील 70 हजार आशा वर्कर्स आजपासून संपावर जाणार आहेत. कोरोना काळात मिळणार्या भत्त्यात वाढ करावी या मागणीसाठी संपावर जाणारा आहेत. मानधना व्यतिरिक्त आशा वर्करना कोरोना काळात दिवसाला 35 रुपये म्हणजे महिन्याला एक हजार भत्ता दिला जातो. महिन्याला पाच हजार भत्ता देण्याची राज्य आशा कर्मचारी कृती समितीने मागणी केली आहे.