Vaccination :विक्रमी लसीकरणासाठी 'Mission Kavach Kundal'ची आरोग्यमंत्री Rajesh Topeयांच्याकडून घोषणा
Continues below advertisement
Mission Kavach Kundal : देशासह राज्यातही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशात कोरोना लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. अशातच आज घटस्थापनेच्या दिवशी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी 'मिशन कवच कुंडलं' (Mission Kavach Kundal)ची घोषणा केली आहे. दसऱ्यापर्यंत देशभरात 100 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीकोनातून राज्यही प्रयत्नशील आहे. राज्यात दररोज 15 लाख लोकांना लस देण्याचं उद्दीष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडे 1 कोटी लशींचा साठा असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Vaccination COVID-19 Vaccination Rajesh Tope Covid-19 Mission Kavach Kundal Maharashtra COVID 19 Vaccination Drive