Maharashtra School : राज्यात तब्बल 100 बोगस शाळांना कायमस्वरुपी टाळं, शिक्षण आयुक्तांची कारवाई
Continues below advertisement
महाराष्ट्रातल्या तब्बल १०० बोगस शाळांना कायमस्वरुपी टाळं ठोकण्यात आलंय.. राज्यात सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा मंडळाच्या जवळपास ८०० शाळा बोगस पद्धतीने कारभार करत आहेत. संबंधित शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यातील शंभर शाळांना कायमस्वरुपी टाळे ठोकले आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. कागदपत्रांच्या बाबतीत गंभीर चुका करणाऱ्या शाळांवर देखील फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
Continues below advertisement