Kolhapur Elephant Protest : माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापुरात राजू शेट्टींची पदयात्रा, हजारोंचा सहभाग

कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मूक पदयात्रा सुरू झाली आहे. नांदणी गावातून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा आहे. पहाटे चार वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. दुपारी ही यात्रा कोल्हापुरात पोहोचेल. राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहेत. हजारो नागरिक या मूक पदयात्रेत सहभागी झाले आहेत. यामध्ये महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचा सहभाग आहे. या नागरिकांचे म्हणणे आहे की, "आमची जी महादेवी हत्ती नी या ठिकाणाहून नेलेली आहे ती परत आम्हाला मिळाली पाहिजे." महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी हे नागरिक नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जात आहेत. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर पाच ते दहा महिला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य सरकार आणि पुढे राष्ट्रपतींकडे दिले जाईल. ही एक आत्मक्लेश पदयात्रा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola