Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 July 2025 : ABP Majha
महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन FaceUp वर नोंदणी केल्यानंतरच मिळणार आहे. FaceUp आणि जिओफेंसिंग अनिवार्य करण्यात आले आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांचा आदेश लवकरच जारी होणार आहे. एसटीच्या एकेरी ग्रुप बुकिंगवरील रकमेत तीस टक्क्यांची वाढ झाली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांना फटका बसणार आहे. गणेश चतुर्थीसाठी मध्य रेल्वेकडून २५० आणि पश्चिम रेल्वेकडून ४४ विशेष ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत अंतर्वाली सराडीत मुंडे कुटुंबीय आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली. मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी तहफुर राणाने डेव्हिड कोलमान हेडलीला मदत करण्यासाठी मुंबईत कॉर्पोरेट कार्यालय उघडलं होतं, असा एनआयएचा दावा आहे. पुण्याच्या दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला, चार जणांविरोधात गुन्हा दाखल. यात एका आमदाराच्या भावाचा समावेश असल्याची माहिती आहे. रेल्वेगाड्यांमध्येही Black Box बसवण्यात येणार आहे, लोको पायलटच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. BLW ने निविदा काढली आहे. करउपसंचालकांच्या घरावर लोकायुक्तांचा छापा पडला, कोट्यवधींची संपत्ती जप्त. कर्नाटकमधल्या हुबळीत ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात डोंगराला तडे जाऊन शाळेमागे दगड कोसळला.