Mahadev Jankar Dasara Melava Beed : पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जानकर यांचं भाषण

Continues below advertisement

Mahadev Jankar Dasara Melava Beed : पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जानकर यांचं भाषण 

हे देखील वाचा

Mahadev Jankar Dasara Melava Beed : पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यात जानकर यांचं भाषण

बीड: लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरासारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही. पण लक्ष्मण हाके (Laxman Hake) याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भगवान बाबा आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला वंदन केले. मी याठिकाणी हाकेंचे स्वागत करते, असे वक्तव्य पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर (Dussehra Melava 2024)  बीडमधील भगवान गडावरील मेळाव्यात भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले.

दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन पंकजा मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी व्यासपीठावरील मान्यवरांची ओळख करुन दिली. ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाकेदेखील या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांची ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी हाके यांचा गोंडस लेकरु असा उल्लेख केला. तेव्हा उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. यानंतर पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महादेव जानकर (Mahadev Jankar), मोनिका राजळे (Monika Rajle), मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस (Suresh Dhas) , नाना करपे , वाघमारे नवनाथ, सदाशिव खाडे, माजी आमदार खंदारे, डॉ. सुनील कायंदे, योगेश जाधव, राधाताई सानप, बाळासाहेब आसबे, अरुण मुंडे, अनिल तांदळे, रामदास बढे, वाल्मीक कराड अशा मान्यवरांची लांबलाचक यादी वाचत त्यांचे स्वागत केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram