Mahadev Jankar : छत्रपती शिवाजी महाराज OBC होते, परभणीत महादेव जानकरांचं वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराज ओबीसी होते, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणीमध्ये केलं आहे. गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी बोलताना जानकर म्हणाले की, "शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना आधी आरक्षण नव्हतं. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं? छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होता. त्यावेळी मराठ्यांना वाटले आम्ही सर्वत्र मिरवतो, आम्हाला नको ते आरक्षण अन् आज काय अवस्था झाली बघा."
Continues below advertisement