Mahadev Jankar: माझ्या बहिणीला रासपात घेऊन मुख्यमंत्री केल्यास तुमची काय अवस्था होईल - महादेव जानकर

Continues below advertisement

Mahadev Jankar: माझ्या बहिणीला रासपात घेऊन मुख्यमंत्री केल्यास तुमची काय अवस्था होईल - महादेव जानकर

तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी दाबला जाणार नाही बहिणीला माझ्या त्रास देताय तिला मी रासपात घेऊन मुख्यमंत्री केले तर..काय होईल तुमचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा भाजपला इशारा मोठे पक्ष लहान पक्षाचे काय हाल करतात हे मी लोकांना सांगणार आहे माझं तुम्ही काही करू शकत नाही ना माझा कारखाना आहे ना दुसरे काही त्यामुळे तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी मी दबणार नाही माझ्या बहीनीला तुम्ही त्रास देताय मी जर तिला रासप मध्ये घेऊन मुख्यमंत्री केले तर तुमची काय अवस्था होईल असा थेट प्रश्न रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला विचारलाय...रासपच्या वतीने जन स्वराज यात्रा काढण्यात आली असुन या यात्रेच्या निमित्ताने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीच्या गंगाखेड मध्ये आले होते यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय...मी कुठल्याही परिस्थितीत दबणार नाही उलट माझ्या बहिणीला जो त्रास देताय तर मी तिला रासप मध्ये घेऊन मुख्यमंत्री केले तर तुमचे काय हाल होतील याचा विचार तुम्ही करा असा इशाराच त्यांनी भाजपला दिलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram