Mahadev Jankar On Baramati Loksabha : पुढची लोकसभा निवडणूक बारामतीतून लढवणार : जानकर

Continues below advertisement

 पुढची लोकसभा निवडणुक बारामतीतून लढणार असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलीय. ते अकोला जिल्ह्यातील बाळापुरात कार्यकर्ता  मेळाव्यात बोलत होतेय. जानकर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणीतून पराभूत झाल्यानंतर. परभणीत आपला पराभव मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचं जानकर म्हणालेय. दरम्यान, बाळापुरातील भाषणात जानकरांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केलीय. वडील आजारी असला की मुलाला तिकीट दिलं जातंय, असं ते म्हणालेय. अकोल्यात भाजपने आजारी असलेल्या संजय धोत्रेंच्या मुलाला तिकीट देत लोकसभेत निवडून आणलंय. त्यामूळे जानकरांचा हा टोला अनुप धोत्रेंना होता काय?, अशी चर्चा सुरू झालीये. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram