Mahabeej | 'बियाणे न उगवायला केवळ बियाणांना दोष का द्यायचा?', महाबीज संघटनेच्या उलट्या बोंबा

'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यांसंदर्भात राज्यभरात उद्भवलेल्या वादात आता महाबीज कर्मचारी संघटनेने उडी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. शेतकरी सोयाबीन उगवलं नसल्याच्या तक्रारी करत असताना सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींसंदर्भात तांत्रिक बाबींकडे का लक्ष दिलं जात नाही?, असा उलटा सवाल त्यांनी केला आहे. सर्वेक्षणाशिवाय नवीन बियाणे देण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे.

तर तक्रारींच्या वाढत्या ओघावर संघटनेनं शंका घेतली आहे. महाबीजला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं जात असल्यानं कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्ची होत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola