Mumbai Local Trains | अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी ई-पासचं बंधन

Continues below advertisement
मुंबई : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी वर्गातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी ठराविक लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे. यापुढे मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ‘क्यु-आर’ कोडचा ई-पास (ईलेक्ट्रॉनिक) आवश्यक असणार आहेत. असे ई-पास देण्यासाठी संबंधित कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रितरीत्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करावी. संबंधित कार्यालयाच्या नोडल अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या कार्यालयातून ई- पास मिळविण्यासाठी समन्वय साधावा, असे आवाहन मुख्य सचिव संजय कुमार यांनी केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram