Mahabaleshwar : महाबळेश्वरच्या पर्वत रांगांमध्ये शुभ्र ढगांची दुलई, पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव

महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून मिरवणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आज पर्यटकांना अभूतपूर्व अनुभव आलाय. हिवाळ्यात तापमानात होणाऱ्या बदलांमुळे महाबळेश्वरभोवती शुभ्र ढगांची दुलई पांघरल्याचं दृश्य आज काही भागात पाहायला मिळालं. थंडीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरात आलेल्या पर्यटकांसाठी ही पर्वणीच होती.. शुभ्र कापसासारख्या ढगांची दरीत  झालेली दाटी पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केलेली दिसून आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola