Madhukarrao Pichad :ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची तब्येत अत्यवस्थ; ब्रेनस्ट्रोकचा धक्का

Continues below advertisement

Madhukarrao Pichad :ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची तब्येत अत्यवस्थ; ब्रेनस्ट्रोकचा धक्का 

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची तब्येत अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा (Brainstroke) झटका बसला आहे.  त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला. मधुकरराव पिचड यांचे वय 84 आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती स्थित असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram