Shivsena offer Congress | 2014 मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव, चव्हाणांच्या वक्तव्यामध्ये तथ्य असू शकतं : माधव भंडारी | ABP Majha
Continues below advertisement
2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा आहे.
Continues below advertisement