India vs Pak : पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदीचं वक्तव्य
Continues below advertisement
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीर (PoK and Gilgit Baltistan) परत घेण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्करानं म्हटलं आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी याबाबत एक वक्तव्य केलंय. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारताकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा प्रलंबित असून भारत आणि पाकिस्तान सीमेदरम्यान यामुळे सतत तणावाचं वातावरण असतं. भारतीय लष्कराचे उपेद्र द्विवेदी यांनी यासंबंधी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे. भारत सरकारने आम्हाला जर आदेश दिला तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर सज्ज आहे.
Continues below advertisement