WEB EXCLUSIVE | नागपूरच्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेचं अहमदाबादला स्थलांतर
नागपूर : महाराष्ट्रवासी कोरोनाशी लढण्यात आणि लॉकडाऊनमुळे विस्कळीत झालेले व्यवसाय, उद्योग सावरण्यात व्यस्त असताना राज्याने एक महत्वाची केंद्रीय संशोधन संस्था गमावली आहे. नागपुरात असलेली राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्था आणि तिची प्रयोगशाळा आता अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये विलीन करण्यात आली आहे. दुर्दैव म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने यासंदर्भात दमदारपणे आवाज उठवलेला नाही. त्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर मध्य भारतातील लाखो खाण कामगारांसाठी त्यांच्या आरोग्याशी निगडीत महत्वाचे संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेने नागपुरातील त्यांचे कार्यालय आणि प्रयोगशाळा गुंडाळत अहमदाबादची वाट धरली आहे.